Month: August 2024

छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली १५० कोटींचा महाघोटाळा; नाशिकहून एकाला अटक

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने हजारो लोकांना फसवण्याच्या प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. नाशिकच्या नरेंद्र पवार याने संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल २० जणांना १ कोटी २८ लाख ७२ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे उघड…

लाडकी बहीण योजनेवरून तृतीयपंथी समाजाचा आक्रोश; मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेत अश्रू अनावर

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना १५०० रुपये देण्यात येणार आहेत. दोन्ही महिन्यांचा हफ्ता महिलांच्या खात्यात लवकरच वर्ग होणार आहे. मात्र, या योजनेमुळे तृतीयपंथी समाजात प्रचंड असंतोष पसरला…

संजय शिरसाट यांचा संजय राऊत यांना तीव्र टोला: “‘दलाल नं 1’ तुमच्यासाठी मीच काढतो!”

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार संजय शिरसाट यांच्यातील वाद आता उफाळून आला आहे. संजय राऊत यांनी ‘नमक हराम 2’ चित्रपट काढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर संजय शिरसाट…

शहरात ट्रॅव्हल्सद्वारे मुंबईहून नशेचा माल: एनडीपीएस पथकाची धडक कारवाई, २० लाखांचा मुद्देमाल आणि ट्रॅव्हल्स बस जप्त!

छत्रपती संभाजीनगर शहरात नशेच्या पदार्थांचा पुरवठा करणारे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. मुंबईहून ट्रॅव्हल्सद्वारे शहरात एमडी बटनचा साठा आणला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर एनडीपीएस पथकाने १० ऑगस्ट रोजी…

आजचे राशभविष्य 11 ऑगस्ट 2024:

मेष (Aries): आज जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल. प्रवास सुखदायक ठरेल आणि कामात यश मिळेल. वृषभ (Taurus): आर्थिक दृष्टिकोनातून दिवस चांगला आहे. कामात स्थिरता राहील, पण खर्च नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे.…

राज ठाकरेंची संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद; आरक्षणावरील भूमिकेवर ठाम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या राज्यव्यापी दौऱ्याचा समारोप छत्रपती संभाजीनगर येथे केला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपली ठाम भूमिका मांडली. “महाराष्ट्रात आरक्षणाची गरज…

बच्चू कडूंचा सरकारला अल्टीमेटम, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन

शेतकरी, दिव्यांगांसह कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली काल शुक्रवारी क्रांतीचौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. भरपावसात विभागीय आयुक्तालयासमोर संपलेल्या या मोर्चात, कडू…

आजचे राशभविष्य 10 ऑगस्ट 2024:

मेष: आजचा दिवस तुम्हाला आर्थिक स्थिरता देईल. व्यापारात यश मिळेल आणि नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान मिळेल. वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी सावधगिरीचा आहे. कोणत्याही आर्थिक व्यवहारात…

छत्रपती संभाजीनगरात ‘भावी मुख्यमंत्री’ बॅनरची लाट: बच्चू कडू आणि इम्तियाज जलील यांचे कार्यकर्ते उत्साहात

छत्रपती संभाजीनगरात सध्या राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. शहरात विविध ठिकाणी लावलेले बॅनर नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या बॅनरवर दोन प्रमुख नेत्यांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून करण्यात आला आहे,…

घाटी नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंग प्रकरण; ११ विद्यार्थ्यांना एका सत्रासाठी निलंबित

घाटीतील नर्सिंग कॉलेजमध्ये तिसऱ्या सत्राच्या १९ विद्यार्थ्यांची रॅगिंग करणाऱ्या चौथ्या व पाचव्या सत्रातील ११ विद्यार्थ्यांना एका सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच, या विद्यार्थ्यांना वसतिगृहातूनही बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क