शेतकरी, दिव्यांगांसह कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली काल शुक्रवारी क्रांतीचौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. भरपावसात विभागीय आयुक्तालयासमोर संपलेल्या या मोर्चात, कडू यांनी सरकारवर कठोर टीका केली. मागण्या मान्य न झाल्यास ५ सप्टेंबरनंतर सरकारविरोधात तीव्र आंदोलन उभारणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

मोर्चात सहभागी दिव्यांग आणि शेतकऱ्यांनी पावसातही न हटता लढ्याची साथ दिली. कडू यांनी त्यांचे आभार मानले आणि पुढील आंदोलनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. २२ सप्टेंबरला शिवाजी पार्कवरून पुढील मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

कर्जमाफी, दिव्यांगांना आर्थिक मदत आणि विषमतेच्या मुद्द्यांवर कडू यांनी सरकारला धारेवर धरले आणि मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरू राहील, असे स्पष्ट केले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

976 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क