Gangster Poster Controversy at Shivjayanti Event

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यात कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर झळकावणाऱ्या तरुणास क्रांती चौक पोलिसांनी अटक केली आहे. दर्शन ऊर्फ विशाल श्याम पवार (साळुंखे) (२१, रा. भवानीनगर) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

बुधवारी (१९ फेब्रुवारी) क्रांती चौक येथे शिवजयंतीच्या सोहळ्यात त्याने “धर्मो धर्म रक्षित” असे लिहून त्याखाली आक्षेपार्ह मजकूर असलेले पोस्टर हातात धरून मिरवणुकीत मिरवत होता.  या प्रकारानंतर माध्यमांनी टीकेची झोड उठवल्याने गुरुवारी (२० फेब्रुवारी) पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली.

या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोहळ्यात एका कुख्यात गुन्हेगाराचे उदात्तीकरण का केले जाते? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर, शहरात नवीन गुन्हेगाराची फॅन फॉलोइंग तयार होत आहे का? यावरही चिंता व्यक्त केली जात आहे.

दुर्लभ कश्यपसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची लोकप्रियता वाढण्याचे प्रमाण अलीकडे वाढत आहे. त्यामुळे पोलिस आणि प्रशासन यावर कडक नजर ठेवतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पोस्टरबाजीच्या या प्रकारामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून कडक कारवाईची मागणी होत आहे. शिवजयंतीसारख्या ऐतिहासिक सोहळ्यात गुन्हेगारी प्रवृत्तींचे उदात्तीकरण होऊ नये, अशी जनभावना आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,314 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क