छत्रपती संभाजीनगर : लॉ सीईटी परीक्षेसाठी आलेल्या १८ परीक्षार्थ्यांच्या दुचाकी व चारचाकींच्या डिकीतून मोबाईल सिमकार्ड, एटीएम आणि क्रेडिट कार्ड चोरून चोरट्यांनी अवघ्या तासाभरात सुमारे ९ लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना सातारा परिसरातील श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेज आणि उस्मानपुरा येथील देवगिरी कॉलेजच्या पार्किंगमध्ये २ व ३ मे रोजी घडली. याप्रकरणी पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरांचा शोध सुरू आहे.

डिकी फोडून सिमकार्ड आणि कार्ड चोरले लॉ सीईटी परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रात मोबाईल आणि पाकीट नेण्यास बंदी असल्याने अनेक परीक्षार्थ्यांनी हे साहित्य वाहनाच्या डिकीत ठेवले. याच गोष्टीचा फायदा घेत चोरट्यांनी विशिष्ट वाहनांची डिकी फोडून सिमकार्ड, रोख रक्कम आणि एटीएम-क्रेडिट कार्ड चोरले. परीक्षेनंतर बाहेर आलेल्या विद्यार्थ्यांना मोबाईल सुरू होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ही चोरी उघडकीस आली.

चोरांची शक्कल आणि सायबर फसवणूक मोबाईल सिमकार्डच्या सहाय्याने ‘फरगेट पिन’ पर्यायातून एटीएम व क्रेडिट कार्डचा पासवर्ड बदलण्यात आला. त्यानंतर विविध एटीएममधून पैसे काढण्यात आले आणि ऑनलाइन व मॉलमधून खरेदीही करण्यात आली. प्रोझोन मॉलमध्ये चोरांनी ५५ हजार रुपयांची खरेदी केल्याचे समोर आले आहे.

पूर्वनियोजन आणि सायबर गुन्ह्याची झलक या चोऱ्या पूर्णपणे नियोजित असून परीक्षेचा वेळ, परीक्षार्थ्यांची प्रोफाइल (नोकरी करणारे, पोलिस, शिक्षक, आयटी इंजिनिअर) याची माहिती चोरट्यांना आधीपासूनच होती. सकाळी साडेसात ते साडेदहा या वेळेतच गुन्हा घडला. पोलिस तपासात तिघेजण सीसीटीव्हीत दिसले असून त्यांच्या चेहऱ्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या एटीएमचा वापर चोरीनंतर तात्काळ रेल्वे स्टेशन परिसरातील एटीएममधून पैसे काढण्यात आले. याआधीही अशाच प्रकारची घटना उस्मानपुरा आणि सातारा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडली असून पोलिस आता या प्रकरणात एकाच टोळीचा हात असल्याचा संशय व्यक्त करत आहेत.

पोलीस तपास सुरू या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून सायबर गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. परीक्षार्थ्यांनी आपल्या कार्ड्सवरील नोंदणीकृत नंबर वेगळा ठेवण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,040 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क