लासूर स्टेशन : गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघा दरोडेखोरांना शिल्लेगाव पोलिसांनी सिनेमा स्टाईल कारवाई करत पकडले. यावेळी मोठा अनर्थ टळला आहे.
पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांना सूत्रांकडून माहिती मिळाली होती की काही दरोडेखोर बँकेच्या परिसरात संशयास्पदरीत्या वावरत आहेत. या माहितीवर तात्काळ कारवाई करत पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र निसर्गे आणि योगेश हरणे यांनी बँकेच्या परिसरात गस्त वाढवली. बँकेच्या बाहेर एका व्यक्तीचा संशयास्पद वावर दिसल्याने याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.
पोलिस निरीक्षक सलीम चाऊस स्वतः घटनास्थळी दाखल झाले आणि पाठलाग करत तिघांना अटक करण्यात आली. पोलिस चौकीत चौकशीत त्यांनी आतापर्यंत 100 पेक्षा अधिक गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीची युनिकॉर्न दुचाकी, दोन मोबाईल, गलूल, कात्री, स्क्रू ड्रायव्हर, ब्लूटूथ हेडफोन आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, बँकेत कोट्यवधींचे व्यवहार होत असतानाही सुरक्षा रक्षक नसल्यामुळे बँक प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा गुन्हा टळला असून गावात पोलीस निरीक्षक सलीम चाऊस व त्यांच्या पथकाचे कौतुक करण्यात येत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*