छत्रपती संभाजीनगर : लग्नाच्या खरेदीसाठी शहरात आलेल्या चाळीसगाव येथील मंजूर रंगरेज (वय २१) या तरुणाला तिघांनी बनावट अपघाताचा बनाव करून कारमध्ये बसवून जंगलात नेले आणि मारहाण करून ३५ हजार रुपयांची लूट केली. ही घटना २५ मे रोजी घडली असून, तरुणाने २८ मे रोजी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मंजूर रंगरेज हा चाळीसगाव येथे मेडिकल क्षेत्रात कार्यरत आहे. २५ मे रोजी तो अल्तमश शेख या मित्रासोबत कारने लग्नखरेदीसाठी शहरात आला होता. रात्री ७ वाजताच्या सुमारास पडेगाव येथून नगरनाक्याच्या दिशेने जात असताना एका ट्रिपलसीट दुचाकीस्वारांनी (एमएच २० जीए ३३६४) त्यांच्या कारला धडक दिली. त्यानंतर मंजूरने गाडी थांबवून कारण विचारले असता, त्या तिघांनी त्याच्यावरच शिवीगाळ केली आणि अपघाताचे नुकसान भरपाई म्हणून पैशांची मागणी केली. मंजूरने नकार दिला असता त्यांनी पोलिस ठाण्यात चलण्यास सांगितले.

पण पोलिस ठाण्याऐवजी त्यांनी मंजूरला नगरनाका परिसरातील केंद्रीय विद्यालयाजवळील निर्जन भागात नेले. तिथे चाकूचा धाक दाखवत त्याला मारहाण केली आणि २० हजार रुपये रोख आणि फोनपेवरून १५ हजार रुपये असे एकूण ३५ हजार रुपये जबरदस्तीने घेतले. या घटनेनंतर घाबरलेला मंजूर गावाकडे परतला. काही दिवसांनी तो पुन्हा शहरात येऊन छावणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

छावणी पोलिसांनी तिघा अज्ञात आरोपींविरुद्ध जबरी चोरी, मारहाणीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,386 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क