छत्रपती संभाजीनगर : पेशंट पाहण्यासाठी घरी बोलावून, लगट करत विनयभंगाचा बनाव रचून डॉक्टरकडून तब्बल ८६ हजार रुपयांची लुबाडणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका महिलेसह तिच्या कुटुंबातील पाच जणांविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात करून पोलिसांनी सांडू लहाने या आरोपीस अटक केली आहे.

या प्रकरणी डॉ. दीपक दिनकर वानखेडे (वय ५०, रा. लोणी बोडखा, ता. खुलताबाद) यांनी हर्सूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

डॉ. वानखेडे यांना एका महिलेचा फोन आला. “हर्सूल येथून शकुंतला लहाने बोलते, आमच्या घरी एक पेशंट आहे, कृपया बघायला या,” असे सांगून तिने डॉक्टरांना घरी बोलावले. डॉक्टर त्यांच्या घरी पोहोचले असता पेशंट बेडरूममध्ये असल्याचे सांगण्यात आले. बेडरुममध्ये गेल्यानंतर सांडू लहाने याने दरवाजा बाहेरून बंद केला. त्याचवेळी शकुंतला हिने डॉक्टरांशी झटापट करत त्यांचे कपडे फाडले आणि पतीला आवाज दिला. सांडूने दरवाजा उघडून मोबाईलमध्ये संपूर्ण प्रकाराचे शूटिंग केले.

यानंतर, “पाच लाख रुपये दे नाहीतर तुझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करते,” अशी धमकी देत डॉक्टरांकडून ७८ हजार रुपये रोख आणि यूपीआयद्वारे ८ हजार असे एकूण ८६ हजार रुपये उकळण्यात आले. उर्वरित रक्कम उद्या द्यावी लागेल, नाहीतर तुला व तुझ्या कुटुंबाला ठार मारू, अशी धमकी देत डॉक्टरला सोडण्यात आले.

या प्रकरणी शकुंतला सांडू लहाने (४०), सांडू लहाने (४७), स्वप्निल लहाने (१८), तसेच शकुंतलाचा जावई आणि मुलगी अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांडू लहानेला अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,550 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क