छत्रपती संभाजीनगर : ‘मी या एरियाचा डॉन आहे…’ असा धाक दाखवत चार जणांच्या टोळीने हॉटेलमधील वेटरवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुना मोंढा भागातील जनता हॉटेलमध्ये मंगळवारी (ता. ५ जून) रात्री सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शेख नाजीम शेख शेरू (वय ४१, रा. बायजीपुरा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मेहमूद याफई ऊर्फ चाऊस, फरू, सुलतान आणि एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार शेख यांचे जुना मोंढा भागात ‘जनता हॉटेल’ आहे. या हॉटेलमध्ये रसिक रज्जाक खान (वय १९, रा. बराईत, उत्तर प्रदेश) हा वेटर म्हणून काम करतो.

५ जूनला रात्री आरोपींच्या चौकडीने हॉटेलमध्ये येऊन जेवणाची ऑर्डर दिली. जेवण येण्यास थोडा वेळ लागत असल्याने रसिकने त्यांना टेबलवर बसण्यास सांगितले. मात्र, आरोपी चाऊस याने टेबलवर बसण्याऐवजी थेट किचनच्या दरवाजाशी जाऊन ‘जल्दी खाना दो…’ अशी मागणी केली. वेटरने संयमाने उत्तर दिले, तरीही चिडून जाऊन त्याने ‘मुझे पहचानता नही क्या? मै इस एरियाका डॉन हूँ…’ म्हणत शिवीगाळ आणि मारहाण केली.

यानंतर त्याच्या साथीदारांनीही वेटरला मारहाण केली. चाऊसने चाकू काढून थेट रसिकच्या पोटात खुपसला. या हल्ल्यात रसिक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र आरोपी पसार झाले. या प्रकरणाचा तपास पीएसआय तनपुरे करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,705 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क