छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील बिल्डा फाट्याजवळ मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेली कार पुलावरील दुभाजकाला जोरदार धडक दिल्याने कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि कारमधील तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृतांमध्ये सय्यद मारुफ सय्यद माजेद, अरफात बागवान आणि रेहान सय्यद यांचा समावेश आहे. तर सय्यद उजेफ आणि शेख शारीक हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हे पाचही तरुण फुलंब्री येथून कारने छत्रपती संभाजीनगरकडे येत होते. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट पुलावरील दुभाजकावर आदळली आणि पलटी झाली. या भीषण अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच फुलंब्री पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सहाणे व त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने जखमींना रुग्णालयात हलवले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

हा अपघात इतका भीषण होता की कार पूर्णपणे नष्ट झाली होती. घटनास्थळी एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू असून, वेग आणि निष्काळजीपणामुळेच अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KOOzOvmJm8UAlKfzgNGy49

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

4,932 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क