वैजापूर :  तालुक्यातील चिंचडगाव शिवारात शुक्रवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. प्रसिद्ध महिला कीर्तनकार ह.भ.प. संगीताताई महाराज पवार (वय 44) यांची त्यांच्या आश्रमात अज्ञात मारेकऱ्याने दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली असून, संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संगीताताई पवार गेल्या अनेक वर्षांपासून चिंचडगाव येथील आश्रमात राहून धार्मिक कार्य करत होत्या. त्यांच्या कीर्तनामुळे त्यांना सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळाला होता. शुक्रवारी रात्री अज्ञात व्यक्तीने त्यांच्या आश्रमात घुसून त्यांच्यावर दगडाने हल्ला करत जागीच ठार मारले.

शनिवारी सकाळी ही घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. वैजापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी, गुन्हे शाखा, आणि श्वान पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा करण्यात आले असून, फॉरेन्सिक पथकाचीही मदत घेतली जात आहे. श्वान पथकाने मारेकऱ्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप ठोस सुगावा लागलेला नाही.

पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून सर्व शक्य कोनातून तपास सुरू आहे. या हत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. संगीताताईंच्या निधनामुळे सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. या घटनेने धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KOOzOvmJm8UAlKfzgNGy49

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,090 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क