छत्रपती संभाजीनगर  : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील सावंगी येथील टोल नाक्यावर शुक्रवारी रात्री दोन कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून थेट गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात भारत घाटगे (कर्मचारी) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तत्काळ छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सावंगी टोल नाक्यावर काम करत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये काहीसा वाद झाला. वाद क्षणातच विकोपाला गेला आणि एका कर्मचाऱ्याने अचानक पिस्तुल काढून घाटगे यांच्यावर गोळीबार केला. गोळी भारत घाटगे यांच्या पोटात घुसल्याने ते रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळले.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलवले. दरम्यान, गोळीबार करणारा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे कंपनीमार्फत पिस्तुल दिले जात नाहीत, मग आरोपीकडे पिस्तुल आले कोठून? त्याच्याकडे पिस्तुल बाळगण्यामागे कोणता उद्देश होता? आणि याआधीही त्याने अशा स्वरूपाचे गुन्हे केले आहेत का? याची चौकशी आता सुरू झाली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी घेण्यात आले आहे. आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल, असा विश्वास पोलीस अधिकारी व्यक्त करत आहेत. दरम्यान, जखमी घाटगे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HxCi3XB18w2Dvq8ojRc05z?mode=ac_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,962 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क