छत्रपती संभाजीनगर : दुबईत कंपनी असून ती ट्रस्ट, गोशाळा आणि नव्या कंपन्यांना फंडिंग करते, तसेच दिलेल्या रकमेच्या तिप्पट पैसे परत मिळतील, असे आमिष दाखवून पुण्यातील अनिल गोविंदा शिंदे याने एका वृद्ध शेतकऱ्याला तब्बल ५० लाखांना गंडवले. ही धक्कादायक फसवणूक १८ मार्च रोजी सिडको परिसरातील एसबीआय बँकेसमोर घडली असून सध्या आरोपी फरार आहे.

फिर्यादी चंद्रभान बापूराव वटाणे (रा. वलखेड, ता. परतूर, सध्या रा. बजाजनगर) हे शेतकरी असून शिक्षणाच्या कारणास्तव पुण्यात ये-जा करत असताना त्यांची ओळख अनिल शिंदेशी झाली. ओळख वाढल्यानंतर शिंदेने दुबईस्थित कंपनीची हौशी माहिती दिली. “तुम्ही पाच लाख दिले तर मी पंधरा लाख परत देईन,” असे सांगत त्याने वटाणे यांना गुंतवणुकीस प्रवृत्त केले.

त्यावर विश्वास ठेवत वटाणे यांनी आपले मित्र, पाहुणे आणि ओळखीच्या लोकांची मदत घेऊन ५० लाखांची रक्कम गोळा केली. यामध्ये पाईकराव यांची “समर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी” ही ट्रस्ट म्हणून दाखवण्यात आली. कंपनीची कागदपत्रे आणि कोरे बॉण्ड देखील शिंदेला देण्यात आले.

शिंदे याने १८ मार्च रोजी वटाणे यांच्या घरी येऊन ५० लाख रुपये रोख घेतले आणि एसबीआय बँकेसमोर नेऊन “कॅनरा बँकेतून आरटीजीएसद्वारे पैसे पाठवतो” असे सांगून फॉर्म भरण्यास सांगितले. वटाणे आणि पाईकराव तासन्‌तास बँकेत वाट पाहत बसले, मात्र पैसे जमा झाले नाहीत. त्यावेळी फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

१४ जुलै रोजी वटाणे यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून त्यावरून सिडको पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HxCi3XB18w2Dvq8ojRc05z?mode=ac_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

892 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क