आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत युतीची औपचारिक घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या युतीची माहिती दिली.

“बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना ही दोन रस्त्यावर लढणाऱ्या संघटना आता एकत्र येत आहेत. त्यामुळे आजचा दिवस आनंदाचा आहे,” असे शिंदे यांनी सांगितले.

“मी मुख्यमंत्री असतानाही सामान्य माणूस म्हणूनच राहिलो आणि आता डिप्टी सीएम झाल्यानंतर देखील मी सामान्य जनतेसाठी काम करतो. आपली बांधिलकी ही सामान्य जनतेशी आहे,” असे भावनिक वक्तव्यही शिंदे यांनी यावेळी केले.

शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या योगदानावर भाष्य करत सांगितले की, “बाबासाहेबांच्या संविधानामुळेच माझ्यासारखा सामान्य माणूस मुख्यमंत्री होऊ शकला. पंतप्रधान नरेंद्र मोदीसारखा सामान्य कार्यकर्ता देशाचे नेतृत्व करू शकतो.”

शिवसेना आणि रिपब्लिकन सेना आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका एकत्र लढणार आहेत. या युतीद्वारे शिंदे गट मराठी मतांबरोबरच दलित मतांवरही भक्कम पकड मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. “शिवशक्ती-भीमशक्ती”चा हा राजकीय फॉर्म्युला राज्याच्या आगामी राजकारणात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता असून, या पार्श्वभूमीवर ही युती महत्त्वाची ठरू शकते.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HxCi3XB18w2Dvq8ojRc05z?mode=ac_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,037 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क