छत्रपती संभाजीनगर : करोडी परिसरात टोलनाक्याजवळील उड्डाणपुलाखाली सोमवारी (दि.२१) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उद्योजक सागर रामभाऊ परळकर (३६, रा. कांचनवाडी) यांचा संशयास्पद मृतदेह आढळून खळबळ उडाली. पोलिसांनी प्राथमिक तपासात घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.

सागर परळकर यांची वाळूज औद्योगिक वसाहतीत ‘पुष्पक अॅग्रो फर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची कृषी क्षेत्रातील कंपनी आहे. रविवारी ते दुचाकीवर कन्नडला गेले होते. उशिरापर्यंत घरी परत न आल्याने आणि त्यांचा मोबाईल बंद असल्याने कुटुंबीय व कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शोध सुरू केला. अखेर सोमवारी सायंकाळी टोलनाक्याजवळ उड्डाणपुलाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती सागर यांच्या मित्रांनी दौलताबाद पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक रेखा लोंढे पथकासह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

घटनास्थळी सागर यांची दुचाकी उभी होती. दुचाकीच्या समोरील भागाचे नुकसान झाले होते. तसेच सागर यांचे वॉलेट व मोबाईल पुलाच्या कठड्यावर सापडले. यामुळे अपघात की घातपात, याचा तपास सुरू असून पोलिस विविध कोनातून चौकशी करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

सागर यांच्या पश्चात आई, पत्नी, मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांनी सागर यांच्या शेवटच्या हालचालींचा तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि दुचाकीच्या नुकसानीच्या आधारे तपासाचा धागा पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच सत्य समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L1Hjnh1fHKDJBUpjMQYvag?mode=ac_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

5,806 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क