छत्रपती संभाजीनगर : शाळकरी मुलांच्या सायकली चोरी करणाऱ्या एका ६० वर्षीय चोरट्यास छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मिसारवाडी भागातून रंगेहाथ अटक केली. पोलिसांनी या चोरट्याकडून एकूण १९ सायकली जप्त केल्या असून, त्यांची एकूण किंमत अंदाजे १ लाख १६ हजार रुपये इतकी आहे.

२९ जुलै रोजी पूजा प्रधान (वय २९) या महिलेने आपल्या मुलाची सायकल घराबाहेरून चोरी झाल्याची तक्रार सिडको पोलीस ठाण्यात नोंदवली होती. यावरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. ३० जुलै रोजी पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम चोरीची सायकल विक्रीसाठी मिसारवाडी येथे आला आहे. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून रात्री ११.३० च्या सुमारास लक्ष्मण भिमराव गायके (वय ६०, रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) यास अटक केली.

चौकशीत त्याने सायकल चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून विविध भागांमधून चोरलेल्या १९ सायकली जप्त केल्या. तो मुख्यतः शाळकरी मुलांच्या सायकली चोरी करत असल्याचे उघड झाले आहे. ही मुले सायकल लॉक न लावता सार्वजनिक ठिकाणी ठेवत असल्याचा फायदा त्याने घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक आयुक्त सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पालकांनी आपल्या मुलांना सायकलला लॉक लावण्याची सवय लावावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/ISo4UL1PjcX2BKGJmHPT79?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,262 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क