छत्रपती संभाजीनगर  : पंढरपूर परिसरात पुन्हा एकदा दुचाकीस्वार चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. जेवण करून घरासमोर शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले. ही घटना १४ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पंढरपूर भागातील स्वामी समर्थ मंदिर परिसरात घडली.

याबाबत एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात १६ ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षा सुनील लघाने (वय ४५, रा. बजाजनगर) या जेवण करून रात्री घरासमोरील गल्लीतील रस्त्यावर शतपावली करत होत्या. त्याच वेळी एका स्पोर्ट्स बाइकवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील २७ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावले.

वर्षा यांनी चोरट्यांना पकडण्यासाठी आरडाओरड केली, परंतु चोरटे सुसाट वेगाने पसार झाले. घटनेनंतर पीडित महिला थेट एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गेल्या. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

अलीकडे शहरात दुचाकीस्वारांकडून मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार वाढले आहेत. यापूर्वीही अशाच घटना घडल्या असून आता हे चोरटे वाळूज आणि पंढरपूर परिसरात सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी रात्री उशिरा किंवा एकट्याने घराबाहेर पडताना दक्षता घ्यावी, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

पोलीस आवाहन: संशयास्पद हालचाली दिसल्यास किंवा अशा प्रकारची घटना घडल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावे. तसेच सोन्याचे दागिने उघडपणे घालून बाहेर जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

944 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क