छत्रपती संभाजीनगर : शहरातील एन-6 परिसरातील संभाजी कॉलनी भागात चाकूने हल्ला करून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात प्रमोद पाडसवान या तरुणाचा मृत्यू झाला असून त्याचे वडील रमेश पाडसवान आणि आई मंदा पाडसवान हे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी कॉलनीमध्ये राहणाऱ्या पाडसवान कुटुंबीयांच्या घरासमोरील मोकळ्या जागेवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. या जागेवर गणेशोत्सवात गणपती बसवण्यासाठी आणि ढोल ठेवण्यासाठी परिसरातील काही तरुण वापर करत होते. मात्र, यावर्षी पाडसवान कुटुंबाने त्या जागेवर बांधकाम करण्याचे ठरवून ढोल ठेवण्यास मज्जाव केला. त्यामुळे चार दिवसांपासून वाद सुरू होते.

शनिवारी सकाळी या वादावरून पुन्हा भांडण झाले आणि धक्काबुक्कीपर्यंत मामला गेला. त्यानंतर तिघा तरुणांनी चाकू घेऊन पाडसवान कुटुंबीयांवर हल्ला केला. हल्ल्यात रमेश पाडसवान यांच्या मुलगा प्रमोदच्या किडनीवर वार झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात रमेश आणि मंदा पाडसवान हेही गंभीर जखमी झाले असून दोघांवरही उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आहे. सिडको पोलिसांनी सौरभ निमोणे, ज्ञानेश्वर निमोणे, गौरव निमोणे आणि त्यांचे वडील काशिनाथ निमोणे यांना अटक केली आहे. या घटनेमुळे संभाजीनगर शहरात खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास सिडको पोलिसांकडून सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

9,533 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क