छत्रपती संभाजीनगर : दारूसाठी पैसे न दिल्याने दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला करणारा गुंड हर्षल मुळे अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. सिडको पोलिसांनी बुधवारी (दि. २०) रात्री एन-९ परिसरातून त्याला अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक योगेश वाघमारे यांच्या पथकाने आरोपीची धिंड काढून माज उतरवला, अशी माहिती पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली.

अधिक माहितीनुसार, हर्षल मुळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंड आहे. रविवारी (दि. १७) रात्री साडेअकराच्या सुमारास विनोद पोटदुखे, गजानन गाडेकर, आकाश राऊत, योगेश निकम, आकाश निकम हे राजू भाऊंच्या चहाच्या हॉटेलजवळ उभे होते. त्याचवेळी आकाश राऊतचे वडील तिथे आले आणि त्याच क्षणी हर्षल मुळे आला. त्याने आकाशच्या वडिलांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. नकार मिळाल्यावर हर्षल संतापला आणि शिवीगाळ करत त्यांच्या पायातील चप्पल काढून घेतली.

या प्रकाराला आक्षेप घेत आकाश आणि त्याच्या मित्रांनी विरोध केला. तेव्हा हर्षल मुळे “मला ओळखलं नाही का? मला हर्षल गणेश मुळे म्हणतात” असे म्हणत चाकू काढून थेट विनोदच्या डाव्या बरगडीवर वार केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. तसेच गजानन गाडेकरच्या पोटाजवळही हल्ला करून त्याला जखमी केले.

हर्षल मुळे एन-९ भागात चाकूच्या धाकावर गुंडगिरी करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्याच्यावर हाणामारीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या आठवड्यात गुंड तेजाची धिंड काढल्यानंतर हर्षल मुळेलाही पोलिसांनी सार्वजनिकरित्या तीच ट्रीटमेंट दिल्याने शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात अशा गुंडगिरीची घटना घडल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, जेणेकरून समाजात कायद्याचा धाक निर्माण राहील.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,529 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क