छत्रपती संभाजीनगर : शहरातील एन-६ भागातील संभाजी कॉलनीमध्ये शुक्रवारी दुपारी घडलेल्या खून प्रकरणाचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लॉटवरील खडी काढण्याच्या कारणावरून निमोने आणि पाडसवान कुटुंबात वाद झाला होता. या वादाने थरकाप उडवणारा हिंसाचाराचा कळस गाठला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की निमोने कुटुंबातील सहा जणांनी पाडसवान कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. यात प्रमोद रमेश पाडसवान (३८) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे वडील रमेश पाडसवान (६०), मुलगा रुद्राक्ष (१७) आणि आई मंदाबाई यांना गंभीर जखमी करण्यात आले. प्रमोद यांच्यावर चाकूने वार केल्याचे दृश्यही या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.
घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी तातडीने कारवाई करत प्रमुख आरोपी ज्ञानेश्वर काशीनाथ निमोनेसह कुटुंबातील पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणात गौरव, सौरव, काशीनाथ निमोने, शशिकला निमोने आणि जावई मनोज दानवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या वादाचा मूळ कारण गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला प्लॉटवरील हक्काचा वाद आहे. गणेश मंडळाचे ढोल ठेवण्यासाठी शेड टाकणे, त्यावरून झालेली तक्रार आणि सातत्याने सुरू असलेले भांडण यामुळे वातावरण तापले होते. अखेर शुक्रवारी निमोने कुटुंबाने पाडसवान कुटुंबावर जीवघेणा हल्ला चढवला.
सध्या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने शहर हादरले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*