छत्रपती संभाजीनगर: सातारा पोलिसांनी गांजा तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल २९ किलो ३३४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईची एकूण किंमत ६ लाख ७ हजार ८० रुपये इतकी आहे. या प्रकरणात दोन आरोपींचा सहभाग असून, एकाला अटक करण्यात आली आहे तर दुसरा फरार झाला आहे.

पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती दुचाकीवरून गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहे. यानुसार, २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होळकर चौक ते सातारा गाव रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला. या सापळ्यात सिंदोन (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील लहू कडूबा मोरे (वय २५) याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून ३८५ ग्रॅम गांजा आणि एमएच २० बीएम ११४६ क्रमांकाची मोटारसायकल जप्त करण्यात आली.

मोरेची चौकशी केली असता, त्याने गांजा पैठण तालुक्यातील गेवराई आगलावे येथील परमेश्वरानंद ऊर्फ गोट्या दहिहंडे याच्याकडून आणल्याचे कबूल केले. त्यानुसार, पोलिसांनी त्या रात्री १०.३० वाजता नगदेश्वर गडावर धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी तब्बल २९ किलो ३३४ ग्रॅम गांजा जप्त केला. मात्र, गोट्या दहिहंडे घटनास्थळावरून फरार झाला.

या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाची किंमत ५ लाख ९२ हजार रुपये इतकी आहे, तर मोटारसायकलची किंमत १५ हजार रुपये असून, एकूण ६ लाख ७ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक काम करत असून, या प्रकरणात पुढील तपास सातारा पोलिस करत आहेत.

गांजा तस्करी रोखण्यासाठी पोलिसांचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून, या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यावर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,795 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क