छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध धंद्यांवर पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत मोठी कारवाई झाली आहे. मुकुंदवाडी परिसरातील अंबिकानगर येथे चरस विक्रीसाठी आलेल्या पाच आरोपींना मुकुंदवाडी पोलिसांनी रविवारी रात्री मोठ्या शिताफीने अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १५ लाख रुपये किमतीचे दीड किलो चरस आणि दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

अटकेतील आरोपींची नावे अशी आहेत – मोहम्मद मुजम्मील मोहम्मद नजीर (३४, रा. रहेमानिया कॉलनी), लोमान ऊर्फ नोमान खान इरफान खान (२१, रा. रहेमानिया कॉलनी), मोहम्मद लईखुद्दीन मोहमद मिराजोद्दीन (२५, रा. रहीमनगर), शेख रेहान शेख अशपाक (१९, रा. कटकटगेट) आणि शेख सुलताना शेख मैनोद्दीन. हे सर्व आरोपी गणेशोत्सवात चरस विक्री करण्याच्या तयारीत होते.

मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे पथक ३० ऑगस्ट रोजी रात्री गस्त घालत असताना अंबिकानगर येथील एका इमारतीत काही जण चरस विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठांना कळवून पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर आणि पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे, हवालदार नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे, गणेश वैराळकर, अनिल थोरे, गणेश वाघ यांच्या पथकाने फॉरेन्सिक टीमसह छापा मारला.

छाप्यात आरोपींकडून १५ लाख किमतीचे दीड किलो चरस आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही सर्व प्रक्रिया पंचासमक्ष पूर्ण करून आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पाचही आरोपींना अटक करून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय बहुरे करत आहेत.

या कारवाईमुळे गणेशोत्सवात होणारा अमली पदार्थांचा अवैध व्यवसाय उघडकीस आला असून पोलिसांकडून पुढील तपासात आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,784 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क