छत्रपती संभाजीनगरातील नंदनवन कॉलनीतील विठ्ठल विशाखा अपार्टमेंटमध्ये गुप्तपणे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा छावणी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या कारवाईत एका पीडित महिलेला मुक्त केले असून, व्यवसाय चालवणारी आंटी मिनाज उस्मान बेग (वय ४५) हिला ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप यांना मिळालेल्या माहितीनुसार, नंदनवन कॉलनीतील एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार मिळाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नागवे, महिला दक्षता समिती सदस्य आणि इतर अधिकारी यांची विशेष टीम तयार करण्यात आली. कारवाईसाठी नकली गिऱ्हाईक पाठवून सापळा रचण्यात आला.

 

गुप्त कारवाईदरम्यान आरोपी आंटी मिनाज बेगने २,००० रुपयांत सौदा निश्चित केला. ठरल्याप्रमाणे महिला फ्लॅटमध्ये पाठविल्यानंतर नकली ग्राहकाने मिस कॉल देत पोलिसांना सिग्नल दिला. तत्काळ पथकाने धाड टाकत आरोपीला ताब्यात घेतले आणि एका पीडित महिलेची सुटका केली. या प्रकरणी पोलिस हवालदार जालिंदर मांटे यांच्या फिर्यादीवरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पोलिसांचा इशारा आणि सतर्कतेचे आवाहन

पोलिसांनी सांगितले की, महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि समाजातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी अशा गुप्त कारवाया सुरू आहेत. उच्चभ्रू सोसायटींमध्ये चालणाऱ्या अशा गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस विशेष मोहीम राबवत आहेत. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनेक महिला अशा जाळ्यातून मुक्त झाल्या आहेत.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये धक्का बसला आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की, कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, ज्यामुळे गुन्हेगारीवर वेळेत नियंत्रण मिळवता येईल. पोलिसांनी अशा बेकायदेशीर व्यवसायाविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा दिला आहे.

या कारवाईनंतर शहरातील उच्चभ्रू भागात सुरु असलेल्या अशा गैरप्रकारांविषयी चर्चा रंगू लागली असून, पोलिसांकडून आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

6,093 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क