छत्रपती संभाजीनगर : शहरात गणेशोत्सवाची सांगता शनिवारी (दि. ६ सप्टेंबर) होत असून बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त उत्साहाने सज्ज झाले आहेत. विसर्जन मिरवणुकांमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असून, शांतता व सुरळीत वाहतूक व्यवस्था राखण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. महापालिकेकडून मूर्ती विसर्जनासाठी शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. यंदा डीजेवर बंदीचे आवाहन करण्यात आले असले तरी, आगमनावेळी अनेकांनी नियमांचा भंग केला होता. त्यामुळे आता विसर्जनावेळी पोलीस प्रशासनाची परीक्षा लागणार आहे.

शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त उभारला आहे. ४ पोलीस उपायुक्त, ७ सहायक पोलीस आयुक्त, ३९ पोलीस निरीक्षक, १५० सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक, तब्बल २४५० पुरुष अंमलदार, ३५० महिला अंमलदार आणि ५०० होमगार्ड्स तैनात असतील. याशिवाय रॅपिड अॅक्शन फोर्सच्या २ कंपन्या, २ दंगा काबू पथके, ३ बॉम्बशोधक व नाशक पथके आणि १२ स्ट्रायकिंग फोर्स सज्ज राहणार आहेत.

शहरातील पैठण गेट, शहागंज, सिटी चौक, बाराभाई ताजिया, राजाबाजार आदी ठिकाणी वॉच टॉवर्स उभारण्यात आले असून, १६ ड्रोन्सद्वारे विसर्जन मिरवणुकीवर आकाशातून देखरेख ठेवली जाणार आहे. तसेच, २१ ठिकाणांना संवेदनशील घोषित करण्यात आले असून, तिथे २१ अधिकारी आणि जवळपास ८४ जवान तैनात केले जातील.

पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांना, गुन्हे शाखेला व विशेष शाखेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. संवेदनशील परिसरात गस्त घालण्याबरोबरच प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. प्रशासनाच्या या तयारीमुळे गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडतील अशी अपेक्षा आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

610 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क