छत्रपती संभाजीनगर : बीड बायपास परिसरात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत २० वर्षीय तरुणीचा जिममध्ये अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला. प्रियंका अनिल खरात (वय २०, रा. बीड बायपास) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. प्रियंका बी.फार्मसी पर्यंत शिक्षण पूर्ण करून पुढील करिअरसाठी तयारी करत होती.

प्रियंकाचे वडील अनिल खरात हे देवगाव रंगारी येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असून, प्रियंका व यश अशी दोन मुले त्यांना आहेत. खरात कुटुंब बीड बायपास परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहे. गुरुवारी सायंकाळी आई बाहेर गेली असल्याने प्रियंकाने वडिलांना चहा करून दिला. त्यानंतर भाऊ यश आणि मैत्रीण प्रणाली कुलकर्णी सोबत ती जिमला गेली. गेल्या महिन्याभरापासून तिने व्यायामाला सुरुवात केली होती.

सुरुवातीला आनंदाने व्यायाम केलेल्या प्रियंकाला अचानक चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली. तात्काळ तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच तिला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. रात्री गादिया विहार स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रियंका आणि तिचा भाऊ यश यांच्यात घट्ट नातं होतं. दोघे नेहमी एकत्र राहायचे. घरातील काम, फिरायला जाणं, अगदी जिमसुद्धा त्यांनी एकत्रच जॉईन केली होती. बहिणीच्या अचानक जाण्याने धक्का बसलेल्या यशने अंत्यसंस्कारावेळी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. एकुलती एक मुलगी गमावल्याने खरात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,974 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क