छत्रपती संभाजीनगर  : सातारा ग्राम महसूल कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी मधुकर आसाराम थोरात (50) आणि खाजगी इसम कैलास प्रभाकर साळुंखे (39) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.

तक्रारदाराने मौजे सातारा येथे प्लॉट खरेदी केला होता. त्या प्लॉटची फेरफार करून सातबाऱ्यावर नाव नोंदवण्यासाठी त्यांनी ग्राम महसूल कार्यालयात अर्ज दिला होता. यावेळी ग्राम महसूल अधिकारी थोरात आणि खाजगी इसम साळुंखे यांनी शासकीय काम करून देण्यासाठी 7 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदारास रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली.

लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी करून त्यानुसार आज (16 सप्टेंबर) शासकीय पंचांच्या उपस्थितीत सापळा रचून सापळ्यात थोरात यांनी कारमध्ये तक्रारदाराकडून 5 हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर त्यांना आणि साळुंखेला पथकाने रंगेहात पकडले.

अंगझडतीत थोरात यांच्या ताब्यात लाचेची रक्कम, जुना मोबाईल आणि रोख पैसे मिळाले. तर साळुंखे यांच्याकडून दोन मोबाईल व रोख रक्कम जप्त करण्यात आली. आरोपींच्या मोबाईलचे परीक्षण केले जाणार असून घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक योगेश शिंदे करीत आहेत. कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

लाचलुचपत विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय कामाकरिता कायदेशीर फी व्यतिरिक्त लाच मागितल्यास तात्काळ संपर्क साधावा. टोल फ्री क्रमांक 1064 व व्हॉट्सअॅप क्रमांक 7720891064 उपलब्ध आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,400 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क