छत्रपती संभाजीनगर : शहरात भरदुपारी दोन महिलांना ‘पोलिस’ असल्याची बतावणी करून तब्बल ९ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवार, २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता स्टेशन रोडवरील भाजप संपर्क कार्यालयासमोर घडली. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी अज्ञात चार तोतयांचा शोध सुरू केला आहे.

या घटनेत मीना प्रदीप सोनी (६५, रा. कोकणवाडी) या महिला फिर्यादी ठरल्या आहेत. त्या मोपेडवरून (एमएच २० बी १८४०) भाजप कार्यालयासमोर भाजी घेण्यासाठी थांबल्या होत्या. त्याचवेळी दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ आले. त्यांनी “पद्मपुरा भागात खून झाला आहे, आम्ही पोलीस आहोत, तुमचे दागिने काढून पिशवीत ठेवा” अशी बतावणी केली. अचानक परिस्थिती पाहून घाबरलेल्या सोनी यांनी आपले दागिने पिशवीत ठेवले. मात्र, चोरट्यांनी हातचलाखीने त्यातील ४ ग्रॅमची सोन्याची चेन आणि ३ ग्रॅमची अंगठी लंपास केली. तोवर आरोपी पसार झाले होते.

याच टोळीने भारती शंकर राठोड यांनाही फसवून त्यांच्याकडील पाच तोळ्यांची सोन्याची पाटली आणि तीन तोळ्यांचे मिनी गंठण असा ऐवज लुबाडला. अशाप्रकारे एकूण नऊ तोळ्यांचे दागिने भामट्यांनी लंपास केल्याचे उघड झाले आहे.

चौघांची ही टोळी दोन दुचाकींवर शहरात फिरत होती. यापैकी दोघे प्रत्यक्ष महिलांना गंडवायचे, तर उर्वरित दोघे लक्ष ठेवण्याचे काम करत होते. आरोपींपैकी एकाने खाकी पॅन्ट घातली होती, ज्यामुळे तो साध्या पोशाखातील पोलीस असल्याचा आभास निर्माण करत होता. हेल्मेटमुळे त्यांची ओळख पटविणे कठीण झाले. यापूर्वीही या टोळीने जवाहरनगर हद्दीत अशाच प्रकारे नागरिकांना फसवून लुटल्याची माहिती समोर आली आहे.

वेदांतनगर पोलिसांनी या प्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. शहरात अशा भेसूर पद्धतीने महिलांना लुटल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KlbV2BdtEZ4Fbi6usVHmPo?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,597 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क