छत्रपती संभाजीनगर : सोलापूर-धुळे महामार्गावर ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता घडलेल्या घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. “पुढे शिंदेवर हल्ला झालाय, आम्ही पोलिस आहोत” असे सांगत बनावट पोलिस ओळखपत्र दाखवत दोन लुटारूंनी वृद्ध दाम्पत्याच्या अंगावरील सोन्याचे तोळाभर दागिने आणि मोबाईल हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

गेवराई तांडा येथील ६७ वर्षीय देविदास सखाराम आजीनाथ हे पत्नीसमवेत लासुर गावातील दाक्षायणी देवीच्या दर्शनावरून परत येत असताना करोडी शिवारातील पुलाखाली दोघा संशयितांनी त्यांना थांबवले. शिंदेंवर हल्ला झाल्याचे सांगत स्वतःला पोलिस म्हणून सादर केले आणि बनावट ओळखपत्र दाखवून दाम्पत्याला दिशाभूल केली. अंगावरील दागिने सुरक्षित ठेवण्याच्या नावाखाली त्यांनी वृद्ध दाम्पत्याला फसवले. बोलण्याच्या नादात आजीनाथ यांच्या पत्नीने कानातले काढून पतीकडे दिले असतानाच दोन्ही लुटारूंनी ते हिसकावले आणि मोबाईलही घेतला.

घडत असलेल्या प्रकाराचा अंदाज येताच देविदास आजीनाथ यांनी धाडस दाखवत एका लुटारूला पकडले. मात्र, त्याने जोराचा धक्का देत पळ काढला. दोघेही शेतातून पळून गेले, तर आजूबाजूचे लोक वैयत्तिक वाद समजून शांतपणे पाहत राहिल्याचे वृद्ध दाम्पत्याने सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रेखा लोंढे आणि उपनिरीक्षक वसंत शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. लुटारूंनी सोडून दिलेली दुचाकी जप्त केली आहे. तपासात दुचाकी ही मध्य प्रदेशातील भोपाळ येथील असून तिच्यावर खोटी नंबर प्लेट लावल्याचे आढळले. या घटनेत इराणी गँगच्या सदस्यांचा सहभाग असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून पुढील तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,039 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क