छत्रपती संभाजीनगर : शहरातील मंगळसूत्र चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. जय विश्वभारती कॉलनी परिसरात पुन्हा एकदा दुचाकीस्वार चोरांनी मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र वृद्ध महिलेला हिसका बसून त्या रस्त्यावर कोसळल्या आणि गंभीर जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी (दि. ४ नोव्हेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास जय विश्वभारती कॉलनीतील श्रीराम मंदिर कमानीजवळ घडली.

जखमींचे नाव स्वरुपा प्रकाश वेरुळकर (वय ६३, रा. जय विश्वभारती कॉलनी) असे असून, त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या दररोजप्रमाणे रात्री ओंकारेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेऊन परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरांनी त्यांच्याजवळ येऊन अचानक गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र स्वरुपा यांनी चोरांच्या भीतीने नकली मंगळसूत्र घातले होते. त्यामुळे ते तुटले नाही, पण चोराच्या जोरदार हिसक्यामुळे त्या रस्त्यावर कोसळल्या. पडताना दुचाकीचा मागील भाग त्यांच्या चेहऱ्यावर आदळला आणि त्यांना डोळ्याजवळ तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, एका तरुणाने दुचाकीस्वार चोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते वेगाने पसार झाले. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक सीताराम केदारे तपास करीत आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

679 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क