धुळे–सोलापूर हायवेवरील तिसगाव येथील हॉटेल ग्रॅण्ड सरोवर येथे रविवारी आयोजित व्हीआयपी उपस्थिती असलेल्या भव्य विवाह सोहळ्यात मोठी खळबळ उडाली. पंतप्रधान कार्यालयातील सचिव तसेच नीती आयोगाचा सदस्य असल्याचा बनाव करत कार्यक्रमात प्रवेश केलेल्या एका तोतया अधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. आलिशान इनोव्हा, अंगरक्षक, सरकारी पाट्या आणि तिरंगा ध्वज यांसह तो मोठ्या थाटामाटात फिरत असल्याने उपस्थितांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता.

गोपनीय शाखेतील पोलिस उपनिरीक्षक सलीम अब्दुल गफूर शेख हे या विवाह सोहळ्यात बंदोबस्तावर होते. सूत्रसंचालकाने “मा. अशोक भारत ठोंबरे – पीएमओ सेक्रेटरी” अशी घोषणा करताच शेख यांना शंका आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तपास सुरू करण्यात आला. अधिक चौकशी केली असता ठोंबरेने स्वतःला नीती आयोगाचा सदस्य असल्याचे सांगितले; मात्र कोणताही अधिकृत ओळख पुरावा न दाखविल्याने त्याची थेट कसून पडताळणी करण्यात आली. त्याच्या उत्तरांत विसंगती स्पष्ट दिसताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

अशोक ठोंबरे हा इनोव्हा (एमएच १२ एसएन ९८९२) कारमधून ‘अधिकारी’सदृश थाटात कार्यक्रमात आला होता. त्याच्यासोबत विकास प्रकाश खंडागळे नावाचा अंगरक्षकही होता. वाहनाची पंचांसमक्ष तपासणी केल्यानंतर “भारत सरकार” अशी पाटी, सरकारी वाहनांवर वापरले जाणारे तिरंगा चिन्ह, धातूची कडी आणि एक सुटकेस आढळली. ही सर्व सामग्री दिल्लीहून मागविल्याचे ठोंबरेने कबूल केले.

पोलिसांच्या माहितीनुसार, हा भामटा यापूर्वीही अनेक कार्यक्रमांना ‘मोठा अधिकारी’ म्हणून उपस्थित राहिला होता. त्याने अन्य कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास सुरू असून कोणाचीही दिशाभूल झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी केले आहे.

अशोक ठोंबरे (४१, उंदरी, ता. केज, बीड) आणि त्याचा साथीदार विकास खंडागळे (३३, तुळजापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि नरेश ठाकरे करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FkdbQ7CBnF2FSoNwbVDkV8

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,191 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क