छत्रपती संभाजीनगर : सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या दहा महिन्यांत चोरीला गेलेले, हरवलेले तसेच रिक्षा-बसमध्ये विसरलेले असे एकूण १०१ मोबाईल पोलिसांनी शोधून काढत नागरिकांना परत केले. मंगळवारी (दि.१७) पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांच्या हस्ते मोबाईल परत करण्यात आले. आपले हरवलेले मोबाईल परत मिळताच नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला.

सिडको परिसरात मागील काही महिन्यांपासून मोबाईल हरवणे, चोरी जाणे किंवा प्रवासादरम्यान वाहनांत विसरण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात नोंद होत होत्या. या तक्रारींचा सखोल तपास करण्यासाठी सिडकोचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी विशेष पथकाला सूचना दिल्या. मोबाईल सायबर पोलिसांच्या मदतीने सातत्याने ट्रेसिंगवर ठेवण्यात आले. तांत्रिक तपासात मिळालेली माहिती सिडको पोलिसांकडे सुपूर्द होताच पोलिसांनी संबंधित मोबाईल वापरकर्त्यांशी संपर्क साधून ते जमा करून घेतले.

या उपक्रमात ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, गृहिणी, कामगार, नोकरदार अशा विविध क्षेत्रातील नागरिकांना त्यांच्या मोबाईलची परतफेड करण्यात आली. या मोहिमेत डीसीपी प्रशांत स्वामी, एसीपी मनोज पगारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल येरमे, पीए–सआय अनिल नाणेकर, हरिदास मैदाड, सहायक फौजदार सुभाष शेवाळे, जमादार मंगेश पवार आणि अन्य पथकाने विशेष मेहनत घेतली.

विशेष म्हणजे काही मोबाईल हे शहरातील विविध भागांसह जालना, बीड, बुलढाणा, जळगाव, अहिल्यानगर येथून परत मिळाले, तर काही उत्तरप्रदेश, गुजरात, झारखंड आणि बिहारमधून स्थानिक पोलिसांच्या मदतीने मागविण्यात आले.

दरम्यान, एका महिलेचा दिवंगत पतीकडून भेट मिळालेला मोबाईल परत मिळाल्याने ती भावुक झाली. पोलिसांच्या या संवेदनशील आणि प्रभावी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FkdbQ7CBnF2FSoNwbVDkV8

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,395 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क