छत्रपती संभाजीनगर : मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून झालेल्या बाइक चोरीप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ८ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे शहरातील सलग होत असलेल्या वाहनचोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार आहे.

तक्रारदार दिलीप बाबुराव सरियाम (वय 35, रा. गोलवाडी कासलावाल) यांनी ७ जुलै रोजी मध्यवर्ती बसस्थानक येथे आपली बजाज प्लसर 150 (क्र. MP-68-ZD-0820) उभी केली होती. याच वेळी अज्ञात आरोपीने लबाडीने मोटारसायकल चोरी केली. त्यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे डीबी पथकाने तपास सुरू केला. पो.उपनि. अशोक इंगोले यांच्या पथकाने कसून शोध घेत आरोपी अथर नजीम शेख (वय 28, रा. फुलेनगर) आणि शेख शहवाज मेराज (वय 23, रा. गरमपाणी) यांना अटक केली. पोलिस कोठडीत चौकशीत दोघांनी शहरातील विविध भागांतील अनेक बाइक चोरी केल्याची कबुली दिली.

त्यांच्या ताब्यातून हिरो हॉण्डा स्प्लेंडर, पॅशन प्लस, अॅक्टीव्हा, मोपेड अशा विविध मॉडेलच्या ८ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे ४ लाख ५० हजार रुपये इतकी आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विरेद्र सिंग, परिमंडळ-१ चे उपआयुक्त पंकज अतुलकर आणि सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने, पोउपनि इंगोले आणि त्यांच्या पथकातील संतोष मुदीराज, माजीद पटेल, भाऊसिंग चव्हाण, संजय श्रीसुंदर आणि इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

या कारवाईमुळे परिसरातील वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश झाला असून आणखी काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HFYPllsnkDF44SYwtqZ04r?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,957 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क