छत्रपती संभाजीनगर : लाखो रुपये शुल्क भरूनही हॉलतिकीट न मिळाल्याने श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्चच्या सुमारे १३३ विद्यार्थ्यांना एमसीए प्रथम वर्षाच्या गुरुवारपासून सुरू झालेल्या परीक्षेला मुकावे लागले. हॉलतिकीट न दिल्यामुळे नुकसान झालेल्या संतप्त विद्यार्थ्यांनी पालकांसह सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत आंदोलन छेडले. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात असल्याने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू झाले. या प्रकरणी तक्रारदार विद्यार्थिनी साक्षी विठ्ठल शेलार (वय २१) हिच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी प्राचार्य संघपाल कांबळे आणि अकाउंट क्लार्क लक्ष्मण गायकवाड यांना अटक केली.

विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १ लाख १० हजार रुपये शुल्क आकारूनही हॉलतिकीट देण्यात संस्थेला अपयश आले. बुधवारपासून विद्यार्थी हॉलतिकीटसाठी ऑफिसमध्ये ठाण मांडून बसले होते. मात्र संस्थेने “विद्यापीठाने तिकीट पाठवले नाही” असा दावा केला. गुरुवारी सकाळी परीक्षा असताना विद्यार्थी कॉलेजसमोर जमले असता कॉलेज प्रशासन आणि शिक्षकांनी कार्यालयाला कुलूप लावून गायब झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, शुल्क भरण्यानंतरही कॉलेज प्रशासनाने वारंवार फोन, संदेश आणि भेटीत टाळाटाळ केली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन पेटवले. “आमचे वर्ष वाया घालवू नका”, “फीस परत द्या”, “हॉलतिकीट द्या” अशी घोषणा देत संताप व्यक्त करण्यात आला.

या प्रकरणी चेअरमन विक्रांत जाधव, प्राचार्य संघपाल कांबळे, अकाउंट क्लार्क लक्ष्मण गायकवाड आणि जे. के. जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भरत पाचोळे करत आहेत. प्राचार्य आणि क्लार्कला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,100 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क