छत्रपती संभाजीनगर : मनपाच्या राजकारणात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या माजी महापौरांचे वर्चस्व कायम राहिले आहे. मात्र, राज्यात शिवसेनेत झालेल्या मोठ्या फुटीनंतर शहरातील राजकीय समीकरणांमध्येही मोठे बदल घडताना दिसत आहेत. आतापर्यंत शिवसेनेच्या तिकिटावर महापौरपद भूषवलेल्या एकूण नऊ माजी महापौरांपैकी तब्बल आठ जणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मनपा राजकारणात शिंदे गटाची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.

या राजकीय घडामोडींमध्ये गुरुवारी (१८ डिसेंबर) माजी महापौर विमल राजपूत यांनीही अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश केला. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या नऊ माजी महापौरांपैकी आता केवळ एकच महापौर ठाकरे गटात असून उर्वरित आठ जण शिंदे गटात सहभागी झाले आहेत. विकास जैन यांच्यापासून सुरू झालेली ही प्रवेशाची साखळी आता विमल राजपूत यांच्यापर्यंत पोहोचली आहे. आगामी मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Db1xJwZQzHhCOL03vSK9xP?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,122 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क