पैठण : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका उमेदवाराच्या घरासमोर जादूटोण्याचे साहित्य आढळून आले. २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याआधीच हा प्रकार समोर आल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

उमेदवाराच्या घरासमोर लिंबू, नारळ, हळद-कुंकू, बाहुली, टाचण पिना तसेच पुजलेली टोपली ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. सकाळच्या सुमारास घरातील सदस्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही वेळातच ही माहिती शहरात पसरताच नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आले.

हा प्रकार संबंधित उमेदवाराला मानसिक दबावात आणण्यासाठी तसेच निवडणुकीत पराभूत करण्याच्या उद्देशाने केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत दोषींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

निवडणूक काळात अशा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या प्रकारांमुळे सामाजिक शांततेला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे प्रशासनाने याची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Db1xJwZQzHhCOL03vSK9xP?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,307 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क