छत्रपती संभाजीनगर : एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेत मेहुण्याला वाचवू न शकल्याच्या तीव्र अपराधी भावनेतून तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. “मला तुमचं खूप ध्यान येतंय, आजचा माझा शेवटचा दिवस आहे…” असा भावनिक व्हॉइस मेसेज आपल्या भावाला पाठवल्यानंतर त्याने धावत्या रेल्वेसमोर उडी घेत जीवनयात्रा संपवली.

या घटनेत सिद्धार्थ शिवाजी दिवेकर (वय ३५) आणि विनोद लक्ष्मण जाधव (वय २५) या साले-मेहुण्यांचा मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ एप्रिल रोजी दोघेही वडगाव कोल्हाटी येथील गट क्रमांक ६८ मधील तलावात पोहण्यासाठी आणि मासेमारीसाठी गेले होते. सुरुवातीला सर्व काही सुरळीत असताना अचानक पोहताना सिद्धार्थ यांचा पाण्याचा अंदाज चुकला आणि ते बुडू लागले. ही बाब लक्षात येताच विनोदने जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, त्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि त्याच्या डोळ्यांसमोरच मेहुण्याचा जलसमाधीने मृत्यू झाला.

ही घटना विनोदसाठी मोठा मानसिक धक्का ठरली. “आपण वाचवू शकलो नाही” ही भावना त्याच्या मनात खोलवर घर करून राहिली. पूर्णपणे खचलेला विनोद तलावाच्या काठावरून एकटाच निघाला. अंदाजे १२ ते १५ किलोमीटर अंतर पार करत तो गाडिया विहार परिसरातील रेल्वे पटरीजवळ पोहोचला.

तेथे पोहोचल्यानंतर त्याने आपल्या धाकट्या भावाला वैभव याला एक भावनिक व्हॉइस मेसेज पाठवला. “मला तुमची खूप आठवण येतेय, आजचा माझा शेवटचा दिवस आहे… आई-वडिलांना नीट सांभाळ,” असे सांगत त्याने शेवटचा निरोप दिला. काही क्षणांतच त्याने धावत्या रेल्वेसमोर स्वतःला झोकून दिले. या भीषण अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या संपूर्ण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका कुटुंबावर दुहेरी आघात झाल्याने नातेवाईक व गावकरी शोकसागरात बुडाले आहेत. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मानसिक ताणतणाव, अपराधी भावना आणि अचानक आलेल्या दुःखातून माणूस किती टोकाचा निर्णय घेऊ शकतो, याचे हे अत्यंत वेदनादायी उदाहरण ठरत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,443 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क