पैठण : तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाणे हद्दीतील लाखेगाव येथे शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी (ता. ४) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून रविवारी पहाटे हा प्रकार समोर आला.

जमिल उमर शेख (वय २९, रा. अलीपुर, लाखेगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते शनिवारी रात्री शेतातील गट क्रमांक ४२ मध्ये कांदा पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. मात्र, ते घरी परतले नाहीत. यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.

रविवारी पहाटे शेतात शोध घेतला असता ते मृत अवस्थेत आढळून आले. शेजारील शेतात तारेचे कुंपण असल्याची माहिती समोर आली असून त्या संदर्भात विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने जमिल शेख यांना ग्रामीण रुग्णालय बिडकीन येथे नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,110 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क