छत्रपती संभाजीनगर : शहरातील चिकलठाणा परिसरातील झाल्टा फाटा येथे अन्न व औषध प्रशासन आणि चिकलठाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत वाहनासह लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाला झाल्टा फाटा परिसरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चिकलठाणा पोलिसांच्या मदतीने संबंधित वाहनावर पाळत ठेवली. संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा आढळून आला.

या कारवाईत वाहनासह एकूण 12 लाख 27 हजार 964 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्यात गुटखाबंदी लागू असतानाही काही जणांकडून बेकायदेशीररीत्या गुटख्याची वाहतूक आणि विक्री केली जात असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा समोर आले आहे.

या प्रकरणी राजेंद्र बाविस्कर व इतर आरोपींविरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त करकळे यांनी ही माहिती दिली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

764 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क