छत्रपती संभाजीनगर : शहरातील रेल्वे स्टेशनजवळील राजीव नगर परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी तत्पर कारवाई करत अवघ्या १२ तासांच्या आत सर्व आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजीव नगर परिसरात काही तरुण एकत्र आले असताना त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर हा वाद विकोपाला गेला. त्यानंतर संतप्त झालेल्या काही जणांनी शेखर देविदास लहाने याच्यावर चाकू तसेच विटांनी हल्ला केला. या हल्ल्यात शेखर गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेत अनिरुद्ध आराख हाही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मारहाणीदरम्यान जखमी अनिरुद्ध याच्याकडून एका आरोपीवर चाकूने वार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात खुनासह खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. विविध तांत्रिक बाबींचा आधार घेत आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या १२ तासांत या गुन्ह्यातील सर्व आरोपींना ताब्यात घेतले.

या प्रकरणी मंगेश गायकवाड, अजय भूतकर, अविनाश बोर्डे, संतोष जाधव, इम्रान पठाण, रोहित गायकवाड, रितेश देवरे, दीपक हिवाळे आणि मंगेश उमले यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास वेदांतनगर पोलीस करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,411 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क