छत्रपती संभाजीनगर : आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ‘Safe Food Safe Maharashtra’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छत्रपती संभाजीनगर शहरात मोठी कारवाई केली. शाहनूरमियाँ दर्गा चौक परिसरातील डी-मार्टजवळील ट्रॅव्हल्स पार्किंगमध्ये दोन बसमधून वाहतूक करण्यात येत असलेला संशयास्पद व निकृष्ट दर्जाचा मिठाई व खवा सदृश अन्नपदार्थांचा तब्बल ३,६९१ किलो ग्रॅम साठा जप्त करण्यात आला. या जप्त मालाची एकूण किंमत ५ लाख ९४ हजार ७३६ रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

मुंबई येथील गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने २० सप्टेंबर २०२६ रोजी ही कारवाई केली. या पथकात अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, कीर्तिका झाडे आणि योगेश चिभादे यांचा समावेश होता.

पहिल्या कारवाईत नीलकंठ ट्रॅव्हल्सवर छापा टाकण्यात आला. अहमदाबादहून आलेल्या नीलकंठ ट्रॅव्हल्सच्या बस क्रमांक AR 01 AR 5135 मधून संशयास्पद अन्नपदार्थ विक्रीसाठी आणल्याचे आढळले. या बसमधून २,०७९ किलो ग्रॅम अन्नपदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ३ लाख ५५ हजार ५०० रुपये आहे. यामध्ये ‘Rich Sweet Delight – Sweetened Condensed Milk Analog (Radhe)’ आणि ‘Sweet Halwa (Radhe)’ या पदार्थांचा समावेश आहे.

त्यानंतर वीर ट्रॅव्हल्सच्या AR 02 C 7878 क्रमांकाच्या बसवर कारवाई करण्यात आली. या बसमधून १,६१२ किलो ग्रॅम संशयास्पद अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. त्याची किंमत २ लाख ४९ हजार २३६ रुपये आहे. यामध्ये Premium Dessert, Sweet Halwa, Rich Sweet Delite आणि Traditional Sweets यांचा समावेश आहे.

जप्त अन्नपदार्थांचे कायदेशीर नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. उर्वरित साठा मराठवाडा कोल्ड स्टोरेज येथे उणे १० अंश सेल्सिअस तापमानात सीलबंद करून ठेवण्यात आला आहे. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानदे कायदा, २००६ अंतर्गत संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी सांगितले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

333 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क