Aurangabad_Hotel_Violence_Crime_News
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका हॉटेलमध्ये धुडगूस घालून कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
ही घटना शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये घडली असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री हॉटेल बंद झाल्यानंतर जेवण देण्यास नकार दिल्याने आठ ते दहा जणांच्या टोळक्याने हॉटेलमध्ये तोडफोड केली.
या टोळक्याने हॉटेलच्या मालमत्तेची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. इतक्यावरच न थांबता त्यांनी कर्मचाऱ्यांना लाठ्या, काठ्या, हॉकी स्टिक आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. हॉटेल मॅनेजरलाही या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले. या प्रकारामुळे हॉटेलमधील कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्रल्हाद मोटे यांच्या फिर्यादीवरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, आरोपी कोण आहेत याची चौकशी सुरू आहे. या घटनेतील काही आरोपींचा राजकीय संबंध असल्याची चर्चा आहे, मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पोलिसांकडून तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EatQ9jy0BXO4VEa0In93E6
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*