Suspicious-Death-Of-A-Married-Woman-After-Her-Husband’s-Demise

छत्रपती संभाजीनगर : पतीच्या निधनानंतर तणावात असलेल्या ३२ वर्षीय विवाहित तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भगतसिंग नगर रोडवरील म्हसोबा नगर येथे सोमवारी (२४ फेब्रुवारी) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तिचा मृतदेह आढळून आला. मृत तरुणीचे नाव सोनाली निखिल पगारे (२२, रा. दिल्ली गेट परिसर) असे आहे.

सोनाली या म्हसोबा नगरमध्ये संशयास्पदरित्या पडलेल्या अवस्थेत आढळल्या. समाजसेविका शारदा घुले यांना याची माहिती मिळताच त्यांनी त्वरित तिला रुग्णालयात दाखल केले आणि हर्सूल पोलिसांना कळवले. मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

नऊ महिन्यांपूर्वी सोनाली यांच्या पतीचे एका गंभीर आजाराने निधन झाले होते. त्याच आजाराची लागण त्यांना झाल्याचे सांगितले जात आहे. पतीच्या अचानक जाण्याने त्या मानसिक तणावात होत्या. कुटुंबीयांनी सांगितल्याप्रमाणे, त्या अनेकदा घरातून निघून जात असत.

सोनाली यांच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,219 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क