छत्रपती संभाजीनगर :  शहरात अंमली पदार्थ विक्री व सेवन रोखण्यासाठी पोलिस आयुक्त प्रविण पवार यांच्या आदेशानुसार विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने कारवाई करत एम.आय.डी.सी. वाळूज पोलीस ठाणे हद्दीतील साऊथ सिटी येथे छापा मारून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला.

या कारवाईत आरोपी जीवन पदमसिंग महेर (वय 35, रा. तपोवन परिसर, पळशी, ता. सिल्लोड) हा गांजाची विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 1 किलो 584 ग्रॅम वजनाचा गांजा, एक मोबाईल आणि इतर मिळून 42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत त्याने हा माल शिवाजी वसंत (रा. रेलगाव, ता. सिल्लोड) याच्याकडून एसटी बसने आणल्याचे सांगितले.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध एम.आय.डी.सी. वाळूज पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त प्रविण पवार, उप-आयुक्त प्रशांत स्वामी आणि सहाय्यक आयुक्त सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गीता बागवडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

शहरातील नागरिकांना कुठेही अंमली पदार्थ विक्री होत असल्यास किंवा संशयास्पद व्यक्ती आढळल्यास 9529019061 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून, सहकार्य करणाऱ्यांना बक्षीस देण्यात येणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,280 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क