गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज: दारूसाठी पैसे न दिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पत्नीच्या भावालाही शिवीगाळ करून डोक्यात वीट मारून जखमी केले. ही घटना गुरुवारी (ता. २०) सायंकाळी सहाच्या सुमारास नांदेडा एकलहेरा येथे घडली.

नांदेडा एकलहेरा येथे 30 वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबासह राहते. गुरुवारी तिचा पती नवनाथ दशरथ जाधव हा दारू पिऊन घरी आला आणि पुन्हा दारू पिण्यासाठी पत्नीकडे पैशांची मागणी करू लागला. मात्र, सिमाने पैसे देण्यास नकार दिला. यावरून नवनाथ संतापला आणि त्याने पत्नीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

पत्नीवर होणाऱ्या अत्याचाराचा आवाज ऐकून तिचा भाऊ अभिषेक आहिरे भांडण सोडवण्यासाठी पुढे आला. मात्र, नवनाथने त्यालाही शिवीगाळ केली आणि डोक्यात वीट मारून गंभीर जखमी केले.

या घटनेनंतर जखमी विवाहिता आणि तिचा भाऊ यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी नवनाथ दशरथ जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार कैलास वाघ करत आहेत.

या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. या प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,552 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क