छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड-भराडी रोडवर बोरगावजवळ भीषण अपघात झाला असून, दोन जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकी आणि पिकअप वाहनात झालेल्या या अपघातात गणेश निकम आणि आशिष परमेश्वर अशी मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.

ही घटना मैत्री दिनाच्या दिवशी घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कन्नडकडून भराडीच्या दिशेने जात असताना गणेश आणि आशिष यांच्या दुचाकीने अचानक ब्रेक दाबलेल्या एका पिकअपला मागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही तरुण जमिनीवर जोरात आदळले आणि त्यांच्या गंभीर जखमांमुळे जागीच मृत्यू झाला.

दोघेही खूप चांगले मित्र होते आणि या दुर्दैवी घटनेमुळे त्यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संभाजीनगर पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला असून, या प्रकरणात पुढील कारवाई केली जाणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

858 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क