छत्रपती संभाजीनगर : राज्यातील महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करावी, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे सोमवारी (दि. ११) क्रांती चौकात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. जोरदार घोषणाबाजी, नाटिका आणि प्रहारक मांडणीमुळे परिसर दणाणून गेला.

“कलंकित मंत्र्यांची मला लाज वाटते”, “रमी खेळणाऱ्या मंत्र्यांची लाज वाटते”, “हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या मंत्र्यांची लाज वाटते”, अशा घोषणांनी आंदोलकांनी सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

या आंदोलनात ‘मला लाज वाटते’ ही नाटिका सादर करण्यात आली. या पथनाट्यात मुलगी नाचत असताना मंत्री नोटा उधळत आहेत, रमी खेळात मग्न असलेले मंत्री, जादूटोणा आणि हनीट्रॅपचे प्रकार दाखवून सरकारमधील काही मंत्र्यांवर थेट निशाणा साधण्यात आला.

शहरातील आंदोलनात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. राज्यभर ठाकरेसेनेच्या वतीने अशाच प्रकारची आंदोलने होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आंदोलनात माजी आमदार उदयसिंग राजपूत, शिवसेना महानगर प्रमुख राजू वैद्य, संतोष खिडके, दिग्विजय शेरखाने, वीरभद्र गादगे, ज्ञानेश्वर डांगे, कमलाकर जगताप, सुकन्या भोसले, आशा दातार, दिपाली बोरसे, राजेंद्र दानवे, राखी परदेशी, मीरा देशपांडे यांच्यासह पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

उद्धवसेनेच्या नेत्यांनी सरकारवर टीका करताना, “जनतेचा विश्वासघात करणाऱ्या, नैतिकतेला तिलांजली देणाऱ्या मंत्र्यांनी पदावर राहण्याचा अधिकार गमावला आहे” असे म्हटले. त्यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी त्वरित कारवाई करून अशा मंत्र्यांची हकालपट्टी करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,771 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क