छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष आशिष सुरडकर आणि गजन गौडा पाटील यांनी त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीत अधिकृत पक्षप्रवेश केला. पक्षाची कार्यपद्धती, विचारधारा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सर्वांनी भाजपा परिवारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या प्रवेशामुळे मनसेला शहरात मोठे खिंडार पडल्याचे मानले जात आहे.
त्यांच्यासोबत प्रवेश करणाऱ्यांमध्ये शहर उपाध्यक्ष प्रशांत आटोळे, शहर सचिव सागर राजपूत, शहर उपाध्यक्ष रामकृष्ण मोरे, जिल्हा चिटणीस विशाल वैद्य, शहर उपाध्यक्ष अमित दायमा, मंदार देसाई, विभाग अध्यक्ष दत्ता भुतेकर, शाखा अध्यक्ष रितेश देवरे, उपविभाग अध्यक्ष प्रल्हाद लहिरे आणि गटाध्यक्ष सचिन दाभाडे यांचा समावेश आहे.
पक्षप्रवेशानंतर आशिष सुरडकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “राज्याला विकासाभिमुख दिशा देणारे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि भाजपा पक्षाची शिस्तबद्ध कार्यपद्धती यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. शहर आणि राज्याच्या प्रगतीसाठी आमचे पुढील सर्व कार्य भाजपा माध्यमातून अधिक जोमाने करू.”
भाजपाने सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत करत त्यांच्या अनुभवाचा संघटनवाढीसाठी उपयोग केला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*