छत्रपती संभाजीनगर : शहरात मित्रांनीच मित्राचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाइल व पैशांच्या वादाच्या संशयातून आरोपी मित्रांनी शकील आरेफ शेख (वय ३०, रा. फुलेनगर) याला जटवाडा परिसरातील ऊर्जा भूमी येथील डोंगरावर नेऊन अमानुष मारहाण करत गळा चिरून हत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. ६ जानेवारी) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आधी शकीलच्या पायाला सिगारेटचे चटके दिले, डोळ्यांवर पट्टी बांधून बेदम मारहाण केली आणि त्यानंतर धारदार शस्त्राने गळा चिरून त्याचा खून केला. या प्रकरणी सय्यद सिराज अली सय्यद नसेर अली ऊर्फ मोठा सिराज याला अटक करण्यात आली असून त्याच्यासह छोटा सिराज, जब्बार, कबीर व आणखी एका आरोपीवर छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत शकीलचा भाऊ सलमान आरेफ शेख याने पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, गेल्या आठवड्यात आरोपी सिराजने शकीलला धमकी दिली होती. आठवडाभरापूर्वी आरोपीने शकीलच्या आईला फोन केल्याने वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर आरोपींनी शकीलचा काटा काढण्याचा कट रचला.

४ जानेवारी रोजी आरोपींनी शकीलला पार्टीचे आमिष दाखवून जटवाडा परिसरात नेले. तेथे मद्यप्राशन केल्यानंतर वाद झाला आणि पूर्वनियोजित कटानुसार त्याच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आली.

घटना घडलेले ठिकाण दौलताबाद व छावणी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येत असल्याने सुरुवातीला हद्दीवरून वाद निर्माण झाला. दौलताबाद पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन घाटीत शवविच्छेदनासाठी पाठवला. अखेर वरिष्ठांच्या आदेशानुसार छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,605 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क