छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा येथे सोमवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक बसल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला. या घटनेमुळे निल्लोड गावावर शोककळा पसरली आहे.

मृतांची ओळख कैलास सखाराम मगर (वय ४५) आणि संजय बारीकराव खटाळ (वय ३५) अशी झाली आहे. दोघेही निल्लोड येथील रहिवासी असून माणिकनगर (निल्लोड) येथील एका बिअरबार मध्ये काम करत होते. सोमवारी रात्री सुमारे ११ वाजता हॉटेल बंद करून ते दुचाकी (एमएच २० एफएच १४१३) वरून घरी परतत होते.

दरम्यान, चिंचखेडा येथील हॉटेल प्रीतीजवळ पाण्याच्या पीव्हीसी पाईपने भरलेला ट्रक (एमएच १६ सीसी ४९४५) रस्त्याच्या कडेला उभा होता. ट्रकचालक टायरची हवा तपासत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. अंधार आणि वेग यामुळे दुचाकीस्वारांना उभा ट्रक दिसला नसावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दुचाकीने ट्रकच्या मागील भागाला दिलेली धडक इतकी जबरदस्त होती की दोघेही ट्रकच्या मागील टायरजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडले.

अपघाताचा आवाज ऐकून नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. मंगळवारी दुपारी निल्लोड येथे त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात दिवसभर शोककळा पसरली होती.

या प्रकरणी वडोदबाजार पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,621 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क