छत्रपती संभाजीनगर : शहरातील बाळापूर शिवार परिसरात शुक्रवारी (दि. ३ एप्रिल) सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. निवृत्त पोलीस उपनिरीक्षक भीमराव कारभारी घुगे (वय ६२) यांचा कोरड्या विहिरीत पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

स्थानिक नागरिकांना विहिरीत व्यक्ती पडल्याची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाला कळविण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेल्या पथकाने मोठ्या प्रयत्नांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर घुगे यांची ओळख पटली.

घुगे हे पोलीस दलातून निवृत्त झालेले अधिकारी होते आणि परिसरात शांत, साध्या स्वभावामुळे परिचित होते. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने नातेवाईक व नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, हा अपघात आहे की इतर काही कारणामुळे ही घटना घडली, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,561 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क