छत्रपती संभाजीनगर : शेतीच्या कामानिमित्त कुटुंबासह गावी गेलेल्या व्यापाऱ्याच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारत रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्याची घटना सिडको एन-६ परिसरातील साईनगर येथे उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी घरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआरही सोबत नेल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिलिंद प्रभाकर भिते (वय ६२) हे २८ मे रोजी शेतीच्या कामासाठी कुटुंबासह त्यांच्या मूळ गावी पिंपळगाव काळे (जि. बुलढाणा) येथे गेले होते. त्यांनी घराला कुलूप लावून ठेवले होते. सोमवारी पहाटे सुमारे ३ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी घरातील हॉल, बेडरूम तसेच कपाटे आणि लॉकर फोडून अवघ्या एका तासात संपूर्ण घर पालथे घातले.

१५ जून रोजी सकाळी घरकामासाठी आलेल्या महिला कर्मचारी सोनाली नन्नावरे यांनी घराचा दरवाजा उघडा आणि घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत पाहिले. त्यांनी तत्काळ भिते यांना याची माहिती दिली. भिते यांनी घरी पोहोचून पाहणी केली असता चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.

चोरट्यांनी घरातील २ लाख ५० हजार रुपयांची रोकड, १० ग्रॅम सोन्याची अंगठी तसेच सुमारे ५०० ग्रॅम वजनाच्या विविध चांदीच्या वस्तू असा एकूण २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सिडको पोलिस अधिक तपास करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

770 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क